Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!

मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून तीव्र विरोध केला जात आहे. हा विरोध करण्यासाठी आज हजारो आंबेडकरी जनता दीक्षाभूमी परिसरात जमा झाले आणि आक्रमकपणे आंदोलन केले. दरम्यान, आंबेडकरी जनतेचा वाढता विरोध आणि आंदोलन पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा केली.

दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते.

मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

दीक्षा भूमीला जे पार्किंगचे काम केले जात आहे, ते होऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. हा आराखडा स्मारक समितीने केलेला आहे. आंदोलकांची स्मारक समितीसोबत एक बैठक होईल. स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन पुढचे काम करण्यात येईल. अशा वास्तूसंदर्भात वेगवेगळी मते असणे योग्य नाही. एकमत झाल्यावर काम करू. स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे सरकारने निधी दिला व काम सुरु केले. आता चर्चेनंतर पुन्हा निर्णय घेऊ. त्यानंतरच काम सुरु केले जाईल, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.

अंडरग्राऊंड पार्किंग ही विजयादशमीच्या दिवशी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकासकामांमध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडूजी व सुशोभिकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -