Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वShare market : शेअर बाजार उच्चांकाला सावधानता आवश्यक

Share market : शेअर बाजार उच्चांकाला सावधानता आवश्यक

  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजाराने मागील आठवड्यात २८ जूनला सलग चौथ्या दिवशी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ७९६७१ आणि निफ्टीने २४१७२ चा उच्चांक केला. व्रज आयर्न अॅण्ड स्टीलच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजेच आयपीओच्या सबस्क्रिप्शनची प्रक्रिया मागील आठवड्यात संपली. कंपनीचे शेअर्स ३ जुलै रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)वर सूचीबद्ध केले जातील.

मागील आठवड्यात एफआयआयने खरेदी आणि डीआयआयनी विक्री केली. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील गुरुवारी भारतीय शेअर बाजारात खरेदी केली. एनएसई वर उपलब्ध तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एफआयआयने ₹ ७,६५८.७७ कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केले. या कालावधीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ₹ ३, ६०५.९३ कोटी किमतीचे समभाग विकले.

मागील आठवड्यात बाजाराने सर्वकालीन उच्चांक गाठला. याआधी काल म्हणजेच २७ जून रोजी शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. याआधी सेन्सेक्सने ७९,३९६ आणि निफ्टीने २४,०८७ चा सर्वकालीन उच्चांक बनवला होता. २५ आणि २६ जून रोजी शेअर बाजारानेही उच्चांक गाठला होता. जागतिक शेअर बाजाराचा विचार करता या महिन्यात एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनव्हीडिया बाजार मूल्याच्या बाबतीत जगातील महाकाय कंपन्या ॲपल, मायक्रोसॉफ्टला मागे सारून पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. अमेरिकी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने तिचे बाजार भांडवल ३.३४ लाख कोटी डॉलरवर (३.३४ ट्रिलियन डॉलर) झेपावले आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल ३.३२ ट्रिलियन डॉलर तर ॲपलचे बाजार भांडवल ३.२९ ट्रिलियन डॉलर आहे.

उल्लेखनीय म्हणजे एनव्हीडिया, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल हे फ्रान्स, ब्राझील, इटली आणि कॅनडा देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे. या महाकाय जागतिक विस्तार असलेल्या तिन्ही कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या निरंतर चढाओढ सुरू आहे. अलीकडच्या काही दिवसांत ॲपलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले होते, आता एनव्हिडियाने हिरावून घेतले आहे.

पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची २३३०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत निर्देशांक निफ्टी तेजीत राहील. गेल्या काही महिन्यांत शेअर बाजाराने फार मोठी तेजी दाखविलेली असल्याने शेअर बाजारात करेक्शनची शक्यता आहे. त्यामुळे पुढे सावधानता बाळगून व्यवहार करणे आवश्यक आहे. सीडीएसएल, आयजीएल, रिलायन्स, डिक्सन, डीव्हिज लॅब यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची असून गुंतवणूक करीत असताना योग्य स्टॉपलॉस लावून व्यवहार करणे आवश्यक आहे. पुढील काळात निर्देशांकात येणारे करेक्शन ही नवीन गुंतवणूकदारांना संधीच असेल.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -