Friday, July 11, 2025

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.


त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.


दिवंगत प्रभावती बावनकुळे यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी (दि. २ जुलै) सकाळी १० वाजता त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानावरून निघून कोलार घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा