Tuesday, July 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगबाबत बौद्ध अनुयायी आक्रमक!

Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगबाबत बौद्ध अनुयायी आक्रमक!

जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन

नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी (Dikshabhoomi) येथील अंडरग्राऊंड पार्किंग (Underground parking) वादाचा विषय बनलं आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोप बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे या पार्किंगला कडाडून विरोध दर्शवत त्यांनी परिसरात जाळपोळ केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली. तर इतर विकासकामाला आमचा विरोध नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला आमचा कडाडून विरोध असल्याचे मत या आंदोलकांनी व्यक्त केलं. आंदोलनकर्त्याचा रोष लक्षात घेता पोलीस फाटा घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून २०० कोटींची वेगवेगळी विकास कामे सुरु आहेत. यामध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडुजी या सर्व कामांचा समावेश आहे. मात्र, त्यासोबतच होत असलेल्या अंडरग्राऊण्ड पार्किंग प्रकल्पाला मात्र आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. विजयादशमी दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर कोणत्याही विकासकामाला त्यांचा विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न

दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि शेकडो बौद्ध अनुयायी जमले आहेत. परिणामी संतप्त जमावाने काही ठिकाणी साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घटनास्थळी आता मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आंदोलकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -