
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी
ठाणे : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेसाठी कोकण पदवीधर मतदारसंघात (Vidhan Parishad Election) अखेर भाजपाने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी २ फेरीतच ५८ हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, मुंबई आणि नाशिक मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीतच निरंजन डावखरे यांना मोठे मताधिक्य मिळाले. दोन फेरीत ८४ हजारांची मतमोजणी झाली. यापैकी ५८ हजार मते निरंजन डावखरे यांना मिळाली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर यांना १९ हजार मते मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे.