Wednesday, July 3, 2024
Homeक्राईमAI voice scam : नोकरी शोधून देता देता छोकरीलाच पटवलं आणि घातला...

AI voice scam : नोकरी शोधून देता देता छोकरीलाच पटवलं आणि घातला ७ लाखांचा गंडा!

AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला

मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI Technology) सर्वच गोष्टी इतक्या सहज आणि सोप्या झाल्या आहेत की त्याच्या माध्यमातून गैरप्रकारांचेच प्रमाण जास्त वाढले आहे. एआयची मदत चांगल्या गोष्टींसाठी न घेता त्याचा वापर करुन गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्या मैत्रिणीला एका महिलेने एआय व्हॉईसचा (AI Voice) वापर करत ७ लाखांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी महिलेचा पतीही सामील होता व तो आता फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला ३४ वर्षांची विधवा असून ती नवी मुंबईत राहणारी होती व गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात होती. ही घटना साधारण ७ महिन्यांपूर्वी सुरु झाली जेव्हा नोकरीची बाब तिने आपल्या शेजारीच राहणाऱ्या मैत्रिणीला सांगितली. रश्मी कार असं या आरोपी मैत्रिणीचं नाव आहे. मैत्रिणीनेही तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पीडित महिलेला अभिमन्यू मेहरा नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला त्याने रश्मी कारने मला तुझा नंबर दिला असून मी तुला नोकरी शोधण्यासाठी मदत करेन, असं सांगितलं.

यानंतर पीडित आणि मेहरानं चॅटिंग सुरू केलं. त्या दोघांचं प्रेम जुळलं व ते रिलेशनशिपमध्ये आले. तरीही पीडित महिला मेहराला भेटलेली नव्हती. यावेळी पीडितेने आरोपीच्या बँक खात्यात सुमारे सात लाख रुपये ट्रान्सफर केले. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, ती नेहमी मेहराला भेटण्याचा प्रयत्न करत असे, मात्र तो नेहमी बोलणं टाळत असे. मेहरा यांनी पीडित महिलेला ब्लँकेटही भेट दिली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

यानंतर पीडितेला संशय आल्याने तिने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तपासादरम्यान रश्मी कारने कबूल केलं की, ती एक ॲप वापरत होती. ज्याच्या मदतीने ती तिचा आवाज बदलून पीडितेशी बोलायची. तिने सांगितलं की, तिने व्हॉईस चेंजिंग ॲप इन्स्टॉल केलं आहे. त्याच अॅपच्या मदतीने ती पीडितेशी संवाद साधायची. यासाठी तिने एक वेगळा फोन नंबर वापरला, जो खास या उद्देशासाठी तयार करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितलं की, रश्मीच्या पतीला या प्रकरणाची माहिती होती आणि त्याने हे प्रकरण थांबवण्याऐवजी बायकोला आणखी प्रोत्साहन दिलं. सध्या तो फरार आहे.

AI Voice Scam म्हणजे काय?

एआय व्हॉईस स्कॅममध्ये, एआयच्या मदतीने, कॉल दरम्यान दुसऱ्या व्यक्तीचा आवाज तयार केला जाऊ शकतो आणि वापरला जाऊ शकतो. बहुतेक अशा प्रकरणांमध्ये, आरोपी स्वत: ला कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा कार्यालयीन सहकाऱ्यांचं नाव घेऊन पैशांची मागणी करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -