Rahul Dravid : वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांची विराट कोहलीकडे 'ही' खास मागणी!

म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण...


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ICC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India Vs South Africa) ७ धावांनी पराभव करत आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने १७७ धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ८ बाद १६९ धावांवर रोखलं. टीम इंडियाने अशाप्रकारे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकला. कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा हा शेवटचा सामना होता.


भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांनी जाता जाता विराट कोहलीला (Virat Kohli) पुढचं मिशन दिलं आहे. राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला सांगितले की, तु सफेद चेंडूतील सर्व बॉक्स टिक केले आहेत. आता लाल चेंडूतील बॉक्स टिक करायचं बाकी आहे. कोहलीने २०११ मधील एकदिवसीय विश्वचषक, २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१४ मधील टी-२० विश्वचषक यासह सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता किंग कोहलीला फक्त रेड बॉल ट्रॉफी म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकायची आहे.



वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा दोनदा पराभव


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंत दोन आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. टीम इंडिया दोन्ही वेळा फायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र, दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. २०२१ मध्ये पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला होता, जिथे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला होता. त्यानंतर २०२३ मध्ये दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. आता टीम इंडिया २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

फॅमिली पेन्शनसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या

“सर, माझं ब्रेकअप झालंय...” Gen Z कर्मचाऱ्याचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये सुट्टीसाठी ईमेल लिहिणं ही रोजचीच बाब असते. पण अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या

लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली