Wednesday, July 3, 2024
Homeक्रीडाRahul Dravid : वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांची विराट कोहलीकडे 'ही'...

Rahul Dravid : वर्ल्डकप जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांची विराट कोहलीकडे ‘ही’ खास मागणी!

म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण…

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ICC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (India Vs South Africa) ७ धावांनी पराभव करत आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने १७७ धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला २० ओव्हरमध्ये ८ बाद १६९ धावांवर रोखलं. टीम इंडियाने अशाप्रकारे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकला. कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा हा शेवटचा सामना होता.

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांनी जाता जाता विराट कोहलीला (Virat Kohli) पुढचं मिशन दिलं आहे. राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला सांगितले की, तु सफेद चेंडूतील सर्व बॉक्स टिक केले आहेत. आता लाल चेंडूतील बॉक्स टिक करायचं बाकी आहे. कोहलीने २०११ मधील एकदिवसीय विश्वचषक, २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१४ मधील टी-२० विश्वचषक यासह सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता किंग कोहलीला फक्त रेड बॉल ट्रॉफी म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकायची आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा दोनदा पराभव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आतापर्यंत दोन आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. टीम इंडिया दोन्ही वेळा फायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र, दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. २०२१ मध्ये पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला होता, जिथे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला होता. त्यानंतर २०२३ मध्ये दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. आता टीम इंडिया २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -