
पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त होत आहे. शहरात मागील आठवडय़ात एरंडवणे भागातच झिकाचे दोन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये 46 वषीय डॉक्टर आणि त्याच्या १५ वषीय मुलीचा समावेश होता. त्यानंतर मुंढवा येथे ४७ वषीय एक महिला आणि तिच्या २२ वर्षांच्या मुलालाही झिकाचे निदान झाले. पुण्यात झिका आजाराचा पाचवा रुग्ण आढळून आला आहे. एरंडवणेतील गणेशनगरमधील गर्भवती महिलेला झिकाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य रुग्णांमध्ये झिका फारसा धोकादायक नसला, तरी गर्भवतीला आणि तिच्या बाळाला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
कोणताही विषाणुजन्य संसर्ग गर्भवतीला झाल्यास नाळेद्वारे बाळाकडे प्रसारित होतो. गर्भवतीला किती लक्षणे तीव्र आहेत, त्यावरही अवलंबून असते. गर्भवतीला झिकाची लागण झाल्यास बाळामध्ये मायक्रोसेफेली म्हणजेच त्याच्या डोक्मयाचा घेर हा नेहमीच्या तुलनेत छोटा होऊ शकतो. तसेच इतर विकृतीही निर्माण होऊ शकतात. म्हणून ही बाब गंभीर असल्याचे स्त्रीरोगतज्ञांचे म्हणणे आहे. पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्मयात ३० जुलै २०२१ मध्ये महाराष्ट्रातील रुग्ण आढळून आला होता. आहे. एका महिलेला झिका आणि चिकनगुनियाची लागण झाली होती. या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी आणि झिकाबाधित रुग्णांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बहुआयामी पथक महाराष्ट्रात रवाना केले होते. पथकाने प्रशासकीय स्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाय, मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर गेल्या वषी येरवडा भागातील एका महिलेला झिकाची लागण झाली होती. यावषी १० दिवसांत झिकाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, काल पुण्यात पालख्यांचे आगमन झाले आहे. दोन-अडीच लाख वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू नये यादृष्टीने उपययोजना करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य उपप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, एरंडवणे भागात गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
यावर्षी १० दिवसांत झिकाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. तसेच इतर विकृतीही निर्माण होऊ शकतात. म्हणून ही बाब गंभीर असल्याचे स्त्रीरोगतज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, काल पुण्यात पालख्यांचे आगमन झाले आहे. दोन-अडीच लाख वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू नये यादृष्टीने उपययोजना करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.