Saturday, May 10, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

विराट कोहली, रोहित शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

विराट कोहली, रोहित शर्माची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई: भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर देत टी-२० वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब केले. यावरून देशभरात जल्लोष आहे. यातच एक एक करून दोन भारतीय क्रिकेटर्सनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.


आधी विराट कोहलीने सांगितले की ही त्याची शेवटची टी-२० मॅच होता. तर काही वेळानंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून याची माहिती दिली. आयसीसीने लिहिले, विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.


३७ वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शनिवारी इतिहास रचला. भारताने टी-२० वर्ल्डकप आपल्या नावे केला. यासोबतच भारताने चौथ्यांदा एखादा वर्ल्डकप खिताब जिंकला आहे. भारतीय संघाने फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. या विजयासह १४० कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची संधी मिळाली. अखेरपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली. मात्र यानंतर चाहत्यांना कोहली आणि रोहितने टी-२०मधून निवृत्ती घेत झटकाही दिला.


सामन्यानंतर रोहित प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला, हा माझा शेवटचा गेम होता. अलविदा म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ नाही. मला ही ट्रॉफी हवी होती. मला हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मला हे हवे होते आणि अशेच झाले. आम्ही आनंदाची सीमा यावेळेस पार केली.



कोहलीचाही अलविदा


विराट कोहलीनेही शनिवारी टी-२० फायनल सामना जिंकल्यानंतर म्हटले, हा माझा शेवटचा टी-२० वर्ल्डकप होता. यात आम्हाला विजय मिळवायचा होता. एक दिवस तुम्हाला असे वाटते की तुम्ही धावा करू शकत नाहीत. असे होते. फक्त संधी होती. आता नाही तर कधीच नाही. हा भारतासाठी माझा शेवटचा टी-२० सामना होता.

Comments
Add Comment