
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या(t-20 World cup 2024) रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत ट्रॉफी मिळवली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहलीसह कोच राहुल द्रविड आणि त्याच्यासोबत संपूर्ण भारत या क्षणाची वाट १७ वर्षांपासून पाहत होते.
वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर रोहित शर्माने खास डान्स मूव्ह करत ट्रॉफी उचलली. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या हातून टी-२० वर्ल्डकप घेतला. ही ट्रॉफी घेताना याचा आनंद कर्णधाराच्या चेहऱ्यावर दिसत होता.
आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ होता. टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा फलंदाजी निवडली मात्र सुरूवात चांगली झाली नाही. भारताने ३४ धावांवर तीन विकेट गमावले होते. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव लवकर बाद होऊन परतले. त्यानंतर अक्षऱ पटेलसोबत मिळून विराट कोहलीने धावसंख्या वाढवण्यास सुरूवात केली.
अखेरीस शिवम दुबेने येत धावसंख्या ७ बाद १७६वर नेऊन ठेवली. कोहलीने ७६ धावा तर अक्षरने ४७ धावांची महत्त्वाची खेळी केली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे भारताने १६९ धावांवर द. आफ्रिकेला रोखताना ७ विकेटनी विजय मिळवला.
THE MOMENT WE HAVE BEEN WAITING FOR 🥺❤️ India are the #T20WorldCup2024 CHAMPIONS 🇮🇳#T20WorldCupFinal | #INDvsSA | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/ue6ZEvGlvI
— Star Sports (@StarSportsIndia) June 29, 2024
रोहित शर्माचा डान्स झाला व्हायरल
द. आफ्रिकेविरुद्ध टी-२० वर्ल्डकप फायनल जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा ट्रॉफी घेण्यासाठी खास अंदाजात आला. त्याने स्टेजवर येण्याआधी बेबी स्टेप डान्स मूव्ह केली आणि हे करत तो स्टेजवर पोहोचला. आधीपासून स्टेजवर उभा असलेला सूर्यकुमार यादवने त्याला साथ दिली. तो कर्णधाराच्या डान्स मूव्ह फॉलो करत होता.