Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीSunita Williams : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुन्हा पृथ्वीवर येणार की...

Sunita Williams : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुन्हा पृथ्वीवर येणार की नाही?

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी ५ जून रोजी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) देखील होते. या गगनभरारीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. मात्र, सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान स्टारलाइनरमध्ये (Starliner) तांत्रिक बिघाड झाला असून त्याचे पृथ्वीवर परतणे कठीण झाले आहे. १४ जून रोजी ते पृथ्वीवर परतणार होते, मात्र या बिघाडामुळे ते अद्याप परतू शकलेले नाहीत. याप्रकरणी नासाकडून (NASA) शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, यावर इस्रो प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याचा चिंतेचा विषय नसावा, लोकांना दीर्घकाळ राहण्यासाठी स्पेस स्टेशन हे सुरक्षित ठिकाण आहे, अशी प्रतिक्रिया एस सोमनाथ यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “हे फक्त सुनीता विल्यम्स किंवा इतर कोणत्याही अंतराळवीरांबद्दल नाही. त्यांना एक ना एक दिवस परत यावे लागेल. संपूर्ण मुद्दा बोईंग स्टारलाइनर नावाच्या नवीन क्रू मॉड्यूलच्या चाचणीचा आहे. ते सुरक्षितपणे परत येण्याच्या क्षमतेबद्दल आहे. ISS हे लोकांसाठी दीर्घकाळ राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.

नवीन अंतराळयानाचे पहिले उड्डाण करण्याच्या धाडसाबद्दल त्यांनी विल्यम्स यांचे कौतुक केले. एस सोमनाथ म्हणाले, “आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या नावावर अनेक मोहिमा आहेत. नवीन अंतराळ यानाच्या पहिल्या उड्डाणावर प्रवास करणे ही एक धाडसी गोष्ट आहे. ते स्वत: डिझाइन टीमचा भाग आहे आणि त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या इनपुटचा वापर केला आहे.”

नासाचे दोन अंतराळवीर ISS वर अधिक काळ राहू शकतात. नासाने शुक्रवारी अंतराळवीरांच्या परतीची कोणतीही तारीख दिली नाही, परंतु ते सुरक्षित असल्याचे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -