छोटासा शाहीर : कविता आणि काव्यकोडी

डोक्यावर फेटा
डफ हाती घेतो
खड्या आवाजात
मी पोवाडा गातो


थोरामोठ्यांचे मी
गातो गुणगान
त्यांच्या कार्याला
करितो सलाम


शिवरायांचे पराक्रम
गातो मी जोशात
आंबेडकरांचे कार्य
सांगतो मोठ्या थाटात


ऐतिहासिक घटनांत
वीररस खास
सामाजिक विषयांत
प्रबोधनाची आस


माझ्या शाहिरीचे
विषय नवे नवे
नमनाला घडाभर
तेल कशाला हवे?


करतो मी माझ्या
कवनाला सुरुवात
रसिक मायबाप हो,
लाभू द्या तुमची साथ!



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) घरात दिसतो
दारात असतो
वाकडी शेपटी
हलवीत बसतो


चोराला ओळखून
लगेच धरतो
घराची राखण
सांगा कोण करतो?


२) ऊन-पाऊस खेळताना
पाहत बसे हसून
श्रावणात हमखास
येते बघा दिसून


आभाळात त्याचे
आहे एक गाव
तानापिहिनिपाजा
ओळखा त्याचे नाव?


३) भाकरी पोळीवर
धार याची धरू
रूक्ष जेवणाला
स्वादिष्ट करू


दुधापासून दही
दह्यापासून लोणी
लोण्यापासून काय मिळेल
सांगा बरं कोणी?



उत्तर -


१) कुत्रा
२) इंद्रधनुष्य
३) तूप

Comments
Add Comment

कोणासाठी...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला

माणूस बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती,

स्ट्रॉ ने पेय कशी पितात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि

बाळाचा हट्ट!

कथा : रमेश तांबे एक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं,

प्रयत्नवादाला स्वीकारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर केल्याने होत आहे रे।  आधी केलेची पाहिजे।

विष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘विष’ हा विषय? बापरे! आजच्या विषयाचे नाव बघून थोडसे घाबरायलाच होतंय ना? पण कोणते