Monday, October 6, 2025

छोटासा शाहीर : कविता आणि काव्यकोडी

छोटासा शाहीर : कविता आणि काव्यकोडी

डोक्यावर फेटा डफ हाती घेतो खड्या आवाजात मी पोवाडा गातो

थोरामोठ्यांचे मी गातो गुणगान त्यांच्या कार्याला करितो सलाम

शिवरायांचे पराक्रम गातो मी जोशात आंबेडकरांचे कार्य सांगतो मोठ्या थाटात

ऐतिहासिक घटनांत वीररस खास सामाजिक विषयांत प्रबोधनाची आस

माझ्या शाहिरीचे विषय नवे नवे नमनाला घडाभर तेल कशाला हवे?

करतो मी माझ्या कवनाला सुरुवात रसिक मायबाप हो, लाभू द्या तुमची साथ!

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१) घरात दिसतो दारात असतो वाकडी शेपटी हलवीत बसतो

चोराला ओळखून लगेच धरतो घराची राखण सांगा कोण करतो?

२) ऊन-पाऊस खेळताना पाहत बसे हसून श्रावणात हमखास येते बघा दिसून

आभाळात त्याचे आहे एक गाव तानापिहिनिपाजा ओळखा त्याचे नाव?

३) भाकरी पोळीवर धार याची धरू रूक्ष जेवणाला स्वादिष्ट करू

दुधापासून दही दह्यापासून लोणी लोण्यापासून काय मिळेल सांगा बरं कोणी?

उत्तर -

१) कुत्रा २) इंद्रधनुष्य ३) तूप

Comments
Add Comment