Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीLonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि…

पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत अशाच पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसोबत होत असलेल्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता लोणावळ्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमच्या (Lonawala Bhushi Dam) मागील बाजूस असलेल्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनाकरता आलेल्या एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थ तातडीने मदतीकरता आले. सध्या वन्यजीव रक्षक आणि पोलीस यांच्या मदतीने शोधमोहिम सुरू आहे. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागला नाही.

भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखलं जातं. अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आलं होतं. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा ते आनंद घेत होते. मात्र, पाण्याला वेग असल्याने ते वाहून गेले. एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात ते वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येतो, तिथे पाच जणांचं शोधकार्य सुरू आहे. यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.

पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -