Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीJio Plans : जिओ यूजर्सना महागाईचा दुहेरी फटका! 'या' प्लॅन्समध्ये मिळणार नाही...

Jio Plans : जिओ यूजर्सना महागाईचा दुहेरी फटका! ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार नाही अमर्यादित 5G डेटा

मुंबई : देशातील टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘रिलायन्स जिओ’ (Jio) याने रिचार्जच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केल्याने वाढत्या महागाईत वापरकर्त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आता रिचार्ज प्लॅनमध्ये (Recharge Price Hike) ग्राहकांना आणखी एक धक्का सोसावा लागणार आहे. जिओ कंपनीने मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवण्यासोबत काही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 5G डेटा देणेही बंद केले आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांना एकाचवेळी दुहेरी फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिओ कंपनीची रिचार्ज प्लॅनची ​​किंमत वाढवण्यापूर्वी एक अट मांडली होती. पूर्वी कोणत्याही ग्राहकाने २३९ रुपये किंवा त्याहून अधिकचा कोणताही रिचार्ज प्लॅन घेतला, तर कंपनीकडून त्याला अनलिमिटेड 5G डेटा दिला जात होता. मात्र आता दररोज २ GB डेटा किंवा त्याहून अधिक डेटासह प्लॅन निवडणाऱ्या ग्राहकांनाच अमर्यादित 5G डेटा मिळू शकेल, असे कंपनीने म्हटले आहे.

‘असा’ असेल जिओचा नवा प्लॅन

  • जिओचा २०९ रुपयांचा २८ दिवसांचा दररोज १ GB डेटा मिळणारा प्लॅन आता २४९ रुपयांमध्ये मिळेल.
  • जिओचा २३९ रुपयांचा २८ दिवसांचा दररोज १.५ GB डेटा मिळणारा प्लॅन आता २९९ रुपयांमध्ये मिळेल.
  • जिओचा ४७९ रुपयांचा ५६ दिवसांचा दररोज १.५ GB डेटा मिळणारा प्लॅन आता ५७९ रुपयांमध्ये मिळेल.
  • जिओचा ६६६ रुपयांचा ८४ दिवसांचा दररोज १.५ GB डेटा मिळणारा प्लॅन आता ७९९ रुपयांमध्ये मिळेल.
  • तर १५५ रुपयांचा Jio प्लॅन २ GB हाय-स्पीड डेटा प्रदान करतो, परंतु आता तुम्हाला या प्लॅनसाठी १८९ रुपये खर्च करावे लागतील.
  • ३९५ या रिचार्ज प्लॅनसह, कंपनी ८४ दिवसांची वैधता आणि ६ GB डेटा प्रदान करतो. पण आता या प्लॅनसाठी यूजर्सना ४७९ रुपये द्यावे लागतील.
  • त्याचबरोबर १५५९ रुपयांचा ३३६ दिवसांच्या या प्लॅनमध्ये एकूण २४ जीबी हाय-स्पीड डेटा देण्यात आला, मात्र या प्लॅनसाठी १८९९ रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -