Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाIND vs SA: रोहित शर्माच्या या चुकीने भारताला फायनलमध्ये हरवलेच असते मात्र...

IND vs SA: रोहित शर्माच्या या चुकीने भारताला फायनलमध्ये हरवलेच असते मात्र बाजी पलटली आणि…

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवत टी-२० वर्ल्डकप २०२४चा खिताब आपल्या नावे केला. या विजयानंतर भारताने ११ वर्षानंतर एखाद्या वर्ल्डकप खिताबाला गवसणी घातली आहे. बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात आलेला सामना खूपच रोमहर्षक राहिला. यात एकावेळेला अशी स्थिती निर्माण झाली होती की टिम इंडिया पराभवाच्या सीमेवर होती. मात्र एकदम बाजी पलटली आणि भारताने विजयश्री खेचून आणली. काय होती कर्णधार रोहित शर्माची चूक?

अक्षर पटेलला १५वे षटक देणे

आफ्रिकेला शेवटच्या ६ षटकांत विजयासाठी ५४ धावांची आवश्यकता होती. क्रीझवर डेविड मिलर आणि हेनरिक क्लासेन स्पिनर्सविरुद्ध चांगला खेळ करत होती. याआधी कुलदीपच्या १४व्या षटकांत १४ धावा आल्या होत्या. आता अशी आशा होती भारताचा कर्णधार १५ वे षटक एखाद्या वेगवान गोलंदाजाला देईल. इतंकच की हार्दिक पांड्याने केवळ एक षटक टाकले होते. दरम्यान, रोहितने अक्षऱकडे चेंडू दिला. त्याच्याआधीच्या ३ षटकांत त्याला २५ धावा मिळाल्या होत्या. अक्षऱला क्लासेनने झोडले आणि त्या षटकातून एकूण २४ धावा निघाल्या.

या ओव्हरनंतर असे वाटत होते की टीम इंडियाने हा सामना गमावला कारण त्यांना शेवटच्या ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या आणि क्रीझवर क्लासेनसोबत डेविड मिलरही उपस्थित होता. यानंतर १६वे षटक जसप्रीत बुमराहने टाकले. त्याने केवळ ४ धावा दिल्या आणि आफ्रिकेवरील दबाव वाढवला. हार्दिकने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हेनरिक क्लासेनला बाद केले. हार्दिकने विकेट घेण्यासोबतच षटकांत केवळ ४ धावा दिल्या.

आता आफ्रिका दबावात आली होती. त्यानंतर १८व्या ओव्हरमध्ये पुन्हा बुमराह आला. त्याने केवळ २ धावा देत १ विकेट घेतली. सामना भारताच्या बाजूने गेला. आता त्यांना २ षटकांत २० धावा हव्या होत्या. दरम्यान डेविड मिलर क्रीझवर होता. १९वी ओव्हर अर्शदीपने टाकली. आता आफ्रिकेला शेवटच्या षटकांत १६ धावा हव्या होत्या.

शेवटची ओव्हर टाकण्यासाठी पुन्हा पांड्या आला. त्याने आपल्या पहिल्याच बॉलवर डेविड मिलरला पॅव्हेलियनला धाडले. मिलरला आऊट करण्यात सगळ्यात मोठे योगदान ठरले ते सूर्यकुमारचे. त्याने जबरदस्त कॅच घेत ही विकेट मिळवली. हार्दिकने या सामन्यात ८ धावा देत २ विकेट मिळवल्या. या पद्धतीने टीम इंडियाने ७ धावांनी विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -