
शिंदे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने मुख्यमंत्र्यांचं जनतेला खास पत्र
मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात २०२२ साली फूट पडली आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना साथ दिलेल्या आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन केले. शिवसेनेने भाजपासोबत हातमिळवणी केली. नंतरच्या काळात अनेक जणांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेना बळकट होत गेली. नंतर अजित पवार यांनी देखील भाजपाला साथ दिली. परिणामी महायुतीलाही याचा फायदा झाला. शिंदेंच्या नेतृत्वाखालील या सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक खास पत्र जनतेसाठी लिहिलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रात लिहिलं आहे की, विचार, विकास आणि विश्वास !
सस्नेह जय महाराष्ट्र
राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार.
जय हिंद. जय महाराष्ट्र. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
विचार, विकास आणि विश्वास ! सस्नेह जय महाराष्ट्र राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2024