Thursday, July 25, 2024
Homeक्राईमBeed crime : धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा...

Beed crime : धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश 

बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री घडली (Beed crime). या घटनेत दोन जण गंभीर झाले होते. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक देवाण- घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बबन गीते यांनी मृत बापू आंधळे यांना बोलावून घेत पैसे आणलेस का? अशी विचारणा करत गोळीबार केल्याचे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरी बोलावून झाडली डोक्यात गोळी

या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

नेमकं प्रकरण काय?

परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत झालेले बाबुराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत. आता बाबुराव आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -