Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीAkola News : धक्कादायक! कुलरचा शॉक लागून चिमुकल्यांचा मृत्यू

Akola News : धक्कादायक! कुलरचा शॉक लागून चिमुकल्यांचा मृत्यू

विजेचा झटक्याने ६जणांनी गमावला जीव

अकोला : राज्यभरात पावसाची (Maharashtra Rain) हजेरी लागली असली तरीही अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा (Heat) देखील चढताना दिसून येत आहे. यामुळे घरात गारवा निर्माण करण्यासाठी अनेकांना एसी (AC) व कुलरची (Cooler) मदत घ्यावी लागत आहे. मात्र हाच कुलर जीवघेणा बनत आहे. अकोल्यात कुलरचा शॉक लागून चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. अकोल्यामध्ये आतापर्यंत कुलरमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या आठवड्याभरात ३ चिमुकल्यांचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अकोल्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पिंजर येथे कुलरचा शॉक लागून ३ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. विरांश रवी राजगुरे असे या चिमुकल्याचे नाव आहे. विरांश हा घरात खेळत होता. खेळता खेळता तो कुलरजवळ गेला. मात्र आचानक त्याला विजेचा झटका लागला. त्याच्या पोटाला दुखापत झाली होती. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन मावस बहिणींचा शॉक लागून मृत्यू

सात दिवसांपूर्वी अकोल्यातल्या अकोट शहरातल्या काळेगावात दोन मावस बहिणींचा कुलरचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला होता. ४ वर्षांची ईशानी प्रवीण ढोले आणि ५ वर्षांची प्रियांशी सोपान मेतकर असे कुलरचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलींची नावे होती. या दोन्ही मुली काळेगाव येथे मामाकडे आल्या होत्या. खेळत असताना कुलरला त्यांचा हात लागला आणि त्यांना जोराचा विजेचा शॉक लागला. या घटनेत दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू

अकोल्यामध्ये काही दिवसांपूर्वी कुलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून पोलिस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत अकोला शहरातील युक्ती अमोल गोगे (७ वर्षे) या मुलीचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर मळसूर गावातील नितीन गजानन वानखडे (३८) या व्यक्तीला देखील कूलर चालू करताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने मृत्यू झाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -