Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाT-20 World cup 2024: तब्बल १७ वर्षांनी भारताने जिंकला टी-२० वर्ल्डकप खिताब,...

T-20 World cup 2024: तब्बल १७ वर्षांनी भारताने जिंकला टी-२० वर्ल्डकप खिताब, बनला नवा टी-२० चॅम्पियन

मुंबई: भारताने टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. भारताने शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.

रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारताने इतिहास रचला.. या संघाने इतिहासात चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय संघाने शनिवारी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी मात दिली. या विजयासोबत १४० कोटी भारतीयांना सेलीब्रेशन करण्याची संधी दिली.

भारतीय संघाने २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकलाआहे. तर दोनदा टी-२० वर्ल्डकप(२००७, २०२४)खिताब जिंकला आहे. संघाने मागील वर्ल्डकप २०११मध्ये जिंकला होता. त्यानंतर १३ वर्षानंतर कोणताही वर्ल्डकप खिताब जिंकता आला नव्हता.

१७७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका एक वेळेस १५ षटकांत ४ बाद १४७ इतक्या धावांवर होती. येथून त्यांचा विजय पक्का वाटत होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय खेचून आणला.
पहिल्यांदा विराट आणि रोहित यांनी एकत्र खेळताना वर्ल्डकप जिंकला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -