Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीRecharge Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! जिओ, एअरटेल नंतर VIकडूनही मोठी...

Recharge Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! जिओ, एअरटेल नंतर VIकडूनही मोठी दरवाढ

जाणून घ्या काय आहे नवीन रिचार्ज प्लॅन

मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसला होता. मात्र वोडाफोन (Vodafone) आणि आयडियाकडून (Idea) रिजार्ज प्लॅनमध्ये कोणतेही बदल केले नसल्यामुळे या कंपनीच्या वापरकर्त्यांचे सुगीचे दिवस चालू होते. परंतु आता महागाईने सामान्यांना तिन्ही बाजूंनी घेरले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवण्याचा (VI Tariff Hike) निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रीपेड आणि पोस्ट पेड अशा दोन्ही प्लॅन्ससाठी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने प्लान्समध्ये १०-२१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे सामान्यांना आता रिचार्ज करणे महाग होणार आहे.

असे असतील रिचार्ज प्लान

४५९ रुपयांचा ८४ दिवसांची वैधता असलेला प्लॅन ५०९ रुपयांचा झाला आहे. ३६५ दिवसांसाठी १७९९ रुपयांचा प्लॅन १९९९ रुपयांचा झाला. २६९ ​​आणि २९९ रुपयांचा २८ दिवसांचा प्लॅन अनुक्रमे २९९ आणि ३४९ रुपयांचा झाला आहे. ३१९ रुपयांचा १ महिन्याचा प्लॅन ३७९ रुपयांचा झाला आहे. डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, १९ रुपयांचा प्लॅन २२ रुपयांचा आणि ३९ रुपयांचा प्लॅन ४८ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनची ​​वैधता १ आणि ३ दिवसांची आहे. तर अनलिमिटेड कॉल प्लानबद्दल बोलायचे झाल्यास २८ दिवसांसाठी १७९ रुपयांचा रिचार्ज प्लानसाठी आता १९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

पोस्ट-पेड प्लानचे रिचार्ज 

पोस्ट-पेड प्लॅनमध्ये ४०१,५०१ रुपयांचे Indivisual Monthly Rental आता ४५१,५५१ रुपये झाले आहे. Family Plan Recharge ६०१, १००१ रुपयांवरून ७०१, १२०१ रुपयांपर्यंत वाढला आहे.

जिओ आणि एअरटेलचे काय आहेत दर?

  • एअरटेलने टॅरिफमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. नवीन प्लाननुसार, आता १७९चा प्लान १९९ रुपयांत मिळणार आहे. प्रीपेड दर दररोज सरासरी ७० पैशांनी वाढले आहेत. पोस्टपेड योजना १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आता ४४९ रुपयांना मिळणार आहे. हे वाढलेले दर ३ जुलैपासून लागू होतील.
  • रिलायन्स जिओनेही रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. बुधवारी कंपनीने, याबाबत माहिती दिली आहे. जिओकडून सांगण्यात आले की, ३ जुलैपासून रिचार्ज प्लॅन १५ ते २५ टक्क्यांनी महाग होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -