Monday, July 1, 2024
Homeब्रेकिंग न्यूजCM Eknath Shinde : राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' लागू करणार!

CM Eknath Shinde : राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ लागू करणार!

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुंबई : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Legislature) सुरु आहे. यामध्ये काल अर्थसंकल्प (Budget) जाहीर करण्यात आला व त्यात महिला, शेतकरी, तरुण वर्ग अशा सर्वांसाठीच राज्य सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यातच आणखी एक मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ (Chief Minister Pilgrimage Scheme) राज्य सरकारने सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी याबाबतची मागणी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र संताची भूमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच २० हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वधर्मीयांसाठी ही योजना सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करु. या योजनेचा आशीर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -