Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीदिल्लीनंतर राजकोट विमानतळावरही छत कोसळले

दिल्लीनंतर राजकोट विमानतळावरही छत कोसळले

राजकोट : मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर छताचा काही भाग कोसळून कॅब चालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्येही अशीच दुर्घटना घडली. गुजरातमधील राजकोट विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळून खाली पडला आहे

.मुसळधार पावसामुळे विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये छत पडला. हे जुलै २०२३ मध्ये लाँच करण्यात आले. अपघाताच्या वेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते हे सुदैवाने म्हणावे लागेल. अन्यथा दिल्लीसारखी दुर्घटना घडू शकली असती.

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छत कोसळल्याने एका कॅब चालकाला जीव गमवावा लागला. या अपघातात सहा जण गंभीर जखमीही झाले आहेत. विमानतळाच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. यामुळे अनेक गाड्यांचा चुराडा झाला. अपघाताच्या वेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताच्या वेळी लोखंडी बीम गाड्यांवर पडल्याने गोंधळ उडाला आणि लोक मदतीसाठी आरडाओरड करताना दिसले.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मुसळधार पावसात पाणी साचल्याने डुमना विमानतळ परिसरात गुरुवारी फॅब्रिक कॅनोपीचा काही भाग कोसळला, ज्यामुळे खाली उभी असलेली एक कार गाडली गेली. विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सकाळी 11.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -