
केंद्राकडे पाठवलेल्या यादीत कोणाच्या नावांचा समावेश?
मुंबई : लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर लगेच सर्व राजकीय पक्ष (Political Parties) विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan Paridhad Election) तयारीला लागले. जुलै महिन्यात ११ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. लोकसभेत काहीसा फटका बसल्यामुळे विधानपरिषदेत महायुती नेमकी कोणाला संधी देणार आणि कसा डाव साधणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत असलेली १० जणांची नावंही समोर आली आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी 'या' नावांचा केंद्राकडे प्रस्ताव
पंकजा मुंडे
अमित गोरखे
परिणय फुके
सुधाकर कोहळे
योगेश टिळेकर
निलय नाईक
हर्षवर्धन पाटील
रावसाहेब दानवे
चित्रा वाघ
माधवी नाईक