
मुंबई: कर्नाटकमध्ये(karnataka) शुक्रवारी भीषण रस्ते अपघाताची(road accident) घटना घडली आहे. राज्याच्या हावेरी जिल्ह्यात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका रस्ते अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जिल्ह्याच्या बागडी तालुकच्या गुंडेनहल्ली क्रॉसजवळ झाला. या रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्या १३ व्यक्तींमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. राष्ट्रीय महागामार्गावर झालेल्या अपघातातील जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करणयात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
टेम्पो ट्रॅव्हलर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना हा भीषण अपघात घडला. या टेम्पो ट्रॅव्हलरने हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हलरच्या पुढच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी केले रेस्क्यू ऑपरेशन
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसोबत अग्निशमन दलाची टीमही घटनास्थळी पोहोचली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. टीमने ट्रॅव्हलरच्या आतून लोकांचे मृतदेह बाहेर काढले. या अपघातात एका मुलाचाही मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातामागचे कारण समजू शकलेले नाहीत. मात्र असे सांगितले जात आहे की ट्रॅव्हलर खूप वेगात होती याच कारणामुळे तिची लॉरीला धडक बसली. ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हरने नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.