Sunday, June 30, 2024
Homeक्रीडाRohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला...

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला भारतीय कर्णधार

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना इंग्लंडशी झाला. दोन्ही संघादरम्यान हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. त्यांचा सामना आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. फायनलचा सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.

रोहितने अर्धशतक ठोकत रचला इतिहास

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. रोहित असा कर्णधार आहे ज्याने टी-२० वर्ल्डकपच्या नॉकआऊट सामन्यात ५० आणि त्याहून अधिक धावा केल्यात. रोहितने ३९ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.

रोहितने या खेळी दरम्यान भारतीय कर्णधाराने ५००० धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो पाचवा कर्णधार आहे. रोहितच्या आधी विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हे यश मिळवले होते.

विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे. कोहलीने कर्णधार म्हणून एकूण२१३ सामन्यांमध्ये १२८३३ धावा केल्यात तर धोनी ११२०७ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ८०९५ धावा आणि सौरव गांगुली ७६४३ धावा यांचा नंबर लागतो.

रोहित शर्माला २०२१मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२२मध्ये विराट कोहली कसोटी कर्णधारापासून दूर झाल्यानंतर त्याला नेतृत्व सोपवण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -