Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Nitesh Rane : एका आजारी माणसाला लिफ्टने नेत देवेंद्रजींनी समाजसेवा केली!

Nitesh Rane : एका आजारी माणसाला लिफ्टने नेत देवेंद्रजींनी समाजसेवा केली!

कालच्या घटनेवर नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

उद्धव ठाकरेंच्या रक्तातच गद्दारी : नितेश राणे

मुंबई : 'भांडुपच्या देवानंदने आज सकाळी दिल्लीमध्ये बसून पत्रकार परिषद घेतली. कालच्या त्या लिफ्टच्या घटनेवर त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला, त्यावर भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन आम्ही आमचे हात अपवित्र करणार नाही, अशी वल्गना ते करत होते. एवढीच जर तुम्हाला भाजपाची एलर्जी आहे तर मग हल्लीच झालेल्या लंडनच्या सुटीमध्ये तुम्ही आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कुठल्या भाजपाच्या नेत्याला भेटले याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडीओज दाखवायचे का? तेव्हा तुम्हाला भाजपा अपवित्र वाटला नाही का?' असा परखड सवाल उपस्थित करत भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आजच्या पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी जेव्हा तुम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकीत विचारलं की, आम्हाला लिहून द्या की भारतीय जनता पक्षाबरोबर उबाठा जाणार नाही, तेव्हा त्यांना तसं का लिहून दिलं नाही? उगाच दिल्लीमध्ये बसून आता वल्गना करायच्या, आता वायफळ बडबड करायची. पण तुमची नेतेमंडळी, तुमचे मातोश्रीचे नातेवाईक कुठल्या भाजपाच्या नेत्याला कुठे, कसे आणि कधी भेटतात याचं प्रेझेंटेशन आम्हाला कधीतरी महाराष्ट्रासमोर द्यावं लागेल, असं नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे पत्रकारांना उद्देशून म्हणाले, उद्धव ठाकरे आणि देवेंद्रजी एकाच लिफ्टने गेले या गोष्टीला तुम्ही उगाच मोठं करताय. ही काही मोठी घटना नाही. एका आजारी माणसाला जर देवेंद्रजी लिफ्टमधून खालून वर घेऊन गेले तर त्यात काही वावगं नाही. माणूस आजारी आहे, छातीत नऊ स्टॅम्प आहेत. जिन्यावर चढण्यासारखी अवस्था नाही. म्हणून देवेंद्रजींनी थोडी समाजसेवा केली तर त्यात वेगळं काही नाही.

उद्धव ठाकरेंच्या रक्तातच गद्दारी

उद्धव ठाकरेला चॉकलेट द्या, मिठाई द्या किंवा काहीही द्या. उद्धव ठाकरे कधी बाळासाहेबांचा झाला नाही, स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही, हिंदू समाजाचा झाला नाही, तर तो माणूस कोणाचाही होऊ शकत नाही. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. स्वतःच्या वडिलांच्या विचारांशी जर तो निष्ठा ठेवू शकत नसेल तर तो कोणाचाच होणार नाही. म्हणून अशा विकृत माणसावर जास्त विश्वास ठेवू नये, त्याला काहीही दिलं तरी त्याच्यात बदल होणार नाही. त्याच्या रक्तातच गद्दारी आहे, अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली.

महाविकास आघाडीला थांबवणं हे आमचं उद्दिष्ट

पक्षश्रेष्ठींनी महायुतीच्या बाबत जे काही निर्णय घेतले आहेत, ते फार विचारपूर्वक घेतले आहेत. अजितदादांना बरोबर घेऊन कोणाला कुठेकुठे फायदा झाला आहे, कोणत्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढली आहे किंवा वाढेल, या सगळ्याचा अभ्यास करुन ही महायुती एकत्र आलेली आहे. महाविकास आघाडीला थांबवणं हे आमचं उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment