Friday, May 23, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

Nashik accident : मद्यधुंद अवस्थेत कारला तर ठोकलंच पण नागरिकांवरही केली गुंडगिरी!

Nashik accident : मद्यधुंद अवस्थेत कारला तर ठोकलंच पण नागरिकांवरही केली गुंडगिरी!

बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत नाशिकच्या तरुणाचा पराक्रम


नाशिक : राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढताना (Accident news) दिसत आहेत. त्यातच पुणे पोर्शे अपघातनंतर अनेक हिट अँड रनच्या घटनाही समोर आल्या. त्यातच आता नाशिकमधून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. यात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने समोरुन येणाऱ्या महिलेच्या कारला धडक दिली. इतकंच नव्हे तर मदतीसाठी आलेल्या नागरिकांवरही त्याने दमदाटी केली.


मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरातून ही घटना समोर आली आहे. मद्यधुंद कार चालकाने एका महिलेच्या कारला धडक दिली. समोरासमोर अपघात झाल्याने यात महिला चालक जखमी झाली. अपघातानंतर आपली बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत मद्यधुंद तरुणाने महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या नागरिकांवर गुंडगिरी केली. हा प्रकार अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत घडला.


दरम्यान, हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तरुणाच्या दमबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अंबड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

Comments
Add Comment