Monday, July 1, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Budget 2024 : लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या 'या' खास योजना!

Maharashtra Budget 2024 : लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या ‘या’ खास योजना!

दरमहा १५०० रुपये, मोफत रिक्षा, वर्षाला तीन सिलेंडर आणि अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना मदत जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Assembly Election) येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांना खूश करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारच्या लाडली बहन योजनेप्रमाणे आता महाराष्ट्रातही ‘माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली आहे.

आज महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत राज्याचे बजेट सादर केले (Maharashtra Budget 2024). या बजेटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यासोबत लाडकी बहीण, अन्नपूर्ण योजना, पिंक रिक्षा या सारख्या योजनांचा देखील समावेश आहे.

महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार

स्त्री हा कुटुंबाचा आधार असून संपूर्ण घराचे व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढताना दिसून येते. अशा कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन देत त्यांना सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील २५ लाख महिलांना प्रतिमाह १५०० हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दहा हजार महिलांना मोफत रिक्षा

महिलांना स्वयंरोजगार आणि सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई-रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील १७ शहरात १० हजार महिलांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ८० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

हर घर नल, हर घल जल

महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबवण्यासाठी ‘हर घर नल, हर घल जल’ योजनेतर्तंगत उर्वरित टप्प्यातील काम पूर्ण करुन घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचवले जाईल.

वर्षाला तीन सिलेंडर मोफत

महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील. राज्यातील ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

महिलांसाठी ‘या’ खास इतर तरतुदी

  • शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणाऱ्या अनुदानात १० हजारावरुन २५ हजारापर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • राज्यातील अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृ्त्ती, राजीनामा, मृत्यू यासाठी एक लाख रुपये इतका लाभ दिला जात आहे.
  • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ६ लाख ४८ बचत गट कार्यरत असून ही संख्या ७ लाख करण्यात येईल. बचत गटाच्या निधीत १५ हजारावरुन ३० हजारापर्यंत वाढ करण्यात येत आहे.
  • राज्यात रुग्णांची विशेषत: गरोदर माता, बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी ३३२४ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यापैकी जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देण्यात येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -