Sunday, May 11, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामीन अखेर हायकोर्टाकडून मंजूर

Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामीन अखेर हायकोर्टाकडून मंजूर

भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीने केली होती अटक


रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED) जमीन घोटाळ्याप्रकरणी जानेवारी महिन्यात अटक केली. यानंतर पाच महिन्यांनी हेमंत सोरेन यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाकडून आज त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.


३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मधल्या काळात ते काही दिवस बाहेरही आले होते. आता तब्बल पाच महिन्यानंतर सोरेन यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.


दरम्यान, ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.तेव्हापासून त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन पक्षाचे कामकाज पाहत आहेत. आता झारखंडमधील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाल्याने पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.



चुलत्यांच्या निधनावेळी देखील नव्हता मिळाला जामीन


एप्रिल महिन्यात हेमंत सोरेन यांनी त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झाल्यामुळे १३ दिवसांचा जामीन द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र ईडी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.


Comments
Add Comment