Saturday, July 5, 2025

IND vs ENG: रोहितचे अर्धशतक, भारताने दिले १७२ धावांचे आव्हान

IND vs ENG: रोहितचे अर्धशतक, भारताने दिले १७२ धावांचे आव्हान

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० वर्ल्डकप २०२४मधील सेमीफायनलच्या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने २० षटकांत धावा केल्या.


या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताची सुरूवात तशी ठीकठाक झाली. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेला विराट कोहली या सामन्यातही अपयशी ठरला. भारताने १९ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर आलेला ऋषभ पंतही केवळ ४ धावा करू शकला.


त्यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला हाताशी घेत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात रोहितने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने ३९ बॉलमध्ये ५७ धावा ठोकल्या. यात त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. तर सूर्याने ३६ बॉलमध्ये ४७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. मात्र त्यालाही २३ धावाच करता आल्या. रवींद्र जडेजा १७ धावांवर नाबाद राहिला. तर अक्षऱ पटेलने १० धावा केल्या.

Comments
Add Comment