
मुंबई: डाळिंब हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या फळांपैकी एक आहे. याचा ज्यूसही अतिशय महाग असतो. अनेक जण ज्यूस म्हटला की मोसंबी अथवा संत्र्याचा पितात मात्र डाळिंबाचा ज्यूसही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डाळिंबाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
डाळिंबाचे दाणेच का खातात?
डाळिंब हे पुनिका ग्रेनेटम झाडाचे फळ आहे. हे फळ कडू असते. यामुळे याच्या केवळ बियाच खाल्ल्या जातात. एका डाळिंबामध्ये साधारण ३० मिलिग्रॅम व्हिटामिन सी असते जे एका दिवसाला लागणाऱ्या व्हिटामिन सीपेक्षा ४० टक्के अधिक आहे. शरीराची सूज कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला जातो.
डाळिंबाचे फायदे
पोटासाठी चांगले
जर तुम्ही दररोज डाळिंब खात आहात तर पोटासाठी हे चांगले आहे. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोबायोटिक्स असतात. यामुळे हे खाल्ल्याने हेल्दी गट मायक्रोबायोमचे उत्पादन वाढते.
मेंदूसाठी चांगले
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट कंपाऊंड आहेत जे नर्व्हस सिस्टीम डॅमेज होण्यापासून वाचवतात. यामुळे कॉग्नेटिव्ह फंक्शन वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते.