Monday, July 1, 2024
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : त्यांनी तर अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं...

Eknath Shinde : त्यांनी तर अडीच वर्ष ‘लाडका बेटा’ योजना राबवली, त्याचं काय?

लाडकी बहीणबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

दादा हे ‘वादा’चे पक्के, अर्थसंकल्प सर्वसमावेशक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon session of Legislature) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये शेतकरी, दूध उत्पादक, महिलावर्ग, तरुणवर्ग अशा सर्वांसाठी फायद्याच्या अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पेट्रोल, डिझेल यांच्याही किंमती कमी करण्यात येणार आहेत. मात्र यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका केली. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

‘लाडकी बहिण योजना राबवली जात आहे. लाडका भाऊ योजना का नाही?’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली आहे. १० हजार रुपये आम्ही देत आहोत. पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दादा हे ‘वादा’चे पक्के आहेत. अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आहे. तसेच तीन सिलेंडर वर्षाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे आम्ही देणार आहोत. त्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

औरंगजेब आणि याकुब मेमन ज्यांचे फादर, त्यांना चादरच दिसणार

चादर फाटली असल्याने सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरुवात केली आहे, अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, औरंगजेब आणि याकुब मेमनला मनाने ज्यांनी फादर मानले आहे. त्यांना चादरीशिवाय दुसरे काय दिसणार? अशी टीका त्यांनी यावेळी जयंत पाटलांवर केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -