Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

Delhi: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात, छत कोसळल्याने ४ जण जखमी

Delhi: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात, छत कोसळल्याने ४ जण जखमी

नवी दिल्ली: दिल्ली एअरपोर्ट(delhi airport) टर्मिनल १वर छत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी टर्मिनल १ वर एअरपोर्टचे छत गाडीवर कोसळले. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. सूचना मिळताच तातडीने तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. दिल्ली फायर सर्व्हिसकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातून सर्वांना वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दिल्ली फायर सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल १वर छत कोसळले. घटनास्थळी ३ अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या. अपघात झाल्यानंतर सुरूवातीला चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.

 

अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश

फायर सर्व्हिसद्वारे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता त्यांना कॉलवर सूचना मिळाली की इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या टर्मिनल १चे छत कोसळले आहे. सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आतापर्यंत तीन जणांना रुग्णालयात धाडण्यात आले मात्र एक व्यक्ती अडकला होता. त्यालाही वाचवण्यात यश मिळाले.

Comments
Add Comment