Sunday, June 30, 2024
Homeक्राईमCrime : दिल्ली हत्याकांडाची पुनरावृत्ती! सततच्या वादाला कंटाळून प्रियकराकडून प्रेयसीचा खून

Crime : दिल्ली हत्याकांडाची पुनरावृत्ती! सततच्या वादाला कंटाळून प्रियकराकडून प्रेयसीचा खून

धारदार शस्त्राने वार करत मृतदेहाचे तुकडे केले अन्…

मुजफ्फरनगर : दोन वर्षांपूर्वी दिल्लीत (Delhi Murder Case) एका प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर नराधमाने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन राहत्या घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. दिल्लीतील या श्रद्धा वाल्कर हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. आता पुन्हा अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर (Crime) येथे नवऱ्याने त्याच्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी उत्तराखंड येथे राहणाऱ्या अरबाज नावाच्या आरोपीने त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर कुटुंबाला न सांगता ते दोघेही भाड्याने खोली घेऊन राहू लागले. मात्र त्यांच्यात काही कारणांवरून नेहमीच वाद सुरू असायचे. अखेर या वादाचे रुपांतर हत्याकांडात झाले. एक आठवड्यापूर्वी अरबाजने त्याच्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे केले. तिचे मुंडके आणि हात वेगळे केले. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडले

एका माहितीदाराकडून पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. दोन व्यक्ती बाईकने काली नदीच्या दिशेने जात आहेत आणि त्यांच्या जवळील एक पोते नदीत फेकून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच एक आरोपी तिथून फरार झाला तर दुसऱ्या युवकाला पोलिसांनी पकडले. तपासात त्या पोत्यात मुंडके नसलेला मृतदेह सापडला अशी माहिती पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी दिली.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. जवळपास ६ महिन्यांपूर्वी त्याने प्रेयसीसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर अनेकदा आमच्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. सतत भांडणे व्हायची. त्यामुळे माझ्या एका सहकाऱ्यासोबत मिळून ७ दिवसांपूर्वी चाकूने गळा कापून तिची हत्या केली असे आरोपीने तपासात सांगितले.

दरम्यान, सध्या पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक नेमले आहे. त्याचसोबत हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. परंतु श्रद्धा वाल्कर हत्याकांडांची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -