
ऊन वाढू लागले की घरातील पंख्याचा स्पीड वाढू लागतो. उन्हापासून बचावासाठी तसेच थंड राहण्यासाठी घरात एअर कंडिशनर , कूलर आणि पंख्याचा वापर केला जातो. घरात पंख्यांचा वापर सर्वाधिक केला जातो.
घरात जर पंखा सुरू असताना जर पाहिले तर पंखा नेहमीच डाव्या बाजूने का फिरतो मात्र याच्यामागचे कारण फार कमी लोकांना माहीत आहे. साधारणपणे अनेक घरांमध्ये टेबल फॅन अथवा सीलिंग फॅनचा वापर केला जातो.
तुम्ही लक्ष देऊन पाहिल्यास टेबल फॅनचे ब्लेड्स नेहमीच उजव्या बाजूला फिरतात. तर सीलिंग फॅन नेहमी डाव्या बाजूला फिरतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का?
पंखा फिरण्यासाठी एक मोटरची गरज असते. या मोटरमध्ये दोन पार्ट्स असतात. एक तर मोटर स्वत: आणि दुसरे पंख्याचे कव्हर असते. सीलिंग फॅनचे कव्हर नेहमीच स्थिर असते. तर मोटर नेहमी डाव्या बाजूला फिरते. पंख्याचे ब्लेड मोटरशी जोडलेले असतात.त्यामुळे पंखा डाव्या बाजूला फिरतो.
तर टेबल फॅनचे उलटे आहे. यात पंख्याची मोटर स्थिर असतात आणि पंख्याचे ब्लेड्स कव्हरशी जोडलेले असतात. पंख्याचे कव्हर उजव्या दिशेला फिरते. यामुळे पंख्याचे ब्लेड्स उजव्या बाजूला फिरतात.