Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Neet paper leak case : नीट पेपरलीक प्रकरणी बिहारमधून दोघांना अटक

Neet paper leak case : नीट पेपरलीक प्रकरणी बिहारमधून दोघांना अटक

सीबीआयची कारवाई, अनेकांवर टांगती तलवार


पाटणा : नीट पेपरलीक प्रकरणी (Neet paper leak case) सीबीआयने (CBI) आज बिहारमधून (Bihar) पहिली अटक केली आहे. सीबीआयने पाटणा येथून मनीष प्रकाश (Manish Prakash) आणि आशुतोष कुमार (Ashutosh Kumar) या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पेपरफुटीप्रकरणी चिंटू आणि मुकेश या दोन आरोपींना सीबीआयने रिमांडवर घेतले आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणात अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मनीष प्रकाश याने आशुतोष कुमारच्या मदतीने नीट परीक्षेच्या एक दिवस आधी (४ मे) बिहारच्या पाटण्यातील एका शाळेतील वसतिगृहात उमेदवारांना बसवून नीट परीक्षेचे पेपर आणि उत्तर पत्रिका दिली होती. सीबीआयने अखेर या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


दरम्यान, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर याविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, दोन आरोपींना आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अनेकांची नावे येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment