Zika virus : झिका व्हायरसचा वाढता धोका! आत्ताच जाणून घ्या कशी घ्याल काळजी?

मुंबई : देशभरात पसरलेला कोरोना व्हायरस (Corona Virus) काहीसा नष्ट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र ऐन पावसाळ्यात डेंग्यू (Dengue), मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. त्यातच आणखी एका व्हायरसमुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुण्यात ‘झिका’ (Zika virus) व्हायरसमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात दोघांना झिकाचा प्रादुर्भाव झाला होता. आता त्यात आणखी एका रुग्णाची भर पडल्याने पुणेकरांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे.


या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. संतुलित आहार या बाबतीत महत्वाची भूमिका बजावतो. पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार शरीराला ऊर्जा तर देतोच पण तो आतून आपल्याला निरोगी बनवतो. त्यामुळे जाणून घेऊयात की झिका व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण कशी काळजी घेऊ शकतो.



प्रथिनेयुक्त आहार घ्या


झिका विषाणूची लागण झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील स्नायू कमजोर होऊ लागतात. त्यामुळे, रुग्णाला अशक्तपणा जाणवू शकतो. या परिस्थितीमध्ये लवकर बरे होण्यासाठी रुग्णाच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. कारण, प्रथिने शरीरातील पेशी आणि स्नायूंच्या सुधारणेसाठी प्रथिने महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी तुम्ही आहारात, डाळी, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता.



शरीर हायड्रेटेड ठेवा


झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी आणि कोणत्याही आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी पुरेसे पाणी पिणे फायदेशीर आहे. खास करून जेव्हा तुमचे शरीर एखाद्या संसर्गाशी लढा देत असते, तेव्हा आपल्या शरीराला अधिक प्रमाणात द्रवपदार्थाची आवश्यकता असते. जेणेकरून आपल्या शरीरातील विषारी घटक आणि संसर्ग बाहेर काढता येतील.



द्रवपदार्थांचा आहारात करा समावेश


शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी आणि फळांचे ज्यूस इत्यादी द्रवपदार्थाचा आहारात जरूर समावेश करा. तसेच, काकडी आणि संत्र्यांचा आहारात अवश्य समावेश करा. यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. रुग्णाला आजारी पडल्यावर पुरेशी भूक लागत नाही आणि तोंडाची चवही जाते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आणि द्रवपदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

Comments
Add Comment

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या