Wednesday, April 23, 2025
Homeटी-२० विश्वचषकT-20 world cup 2024: द. आफ्रिकेच्या माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संघ ढेपाळला, केवळ ५७...

T-20 world cup 2024: द. आफ्रिकेच्या माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संघ ढेपाळला, केवळ ५७ धावांचे दिले आव्हान

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) द. आफ्रिकेला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता केवळ ५७ धावांची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ५६ धावा केल्या.

अफगाणिस्तानच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा त्यांचा निर्णय त्यांनाच चांगला महागात पडला. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यापुढे आफगाणिस्तानचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे एकामागून एक विकेट पडतच होते. त्यांना या सामन्यात केवळ ५६ धावाच करता आल्या.

अफगाणिस्तान संघाचा पहिला विकेट रहमानुल्लाह गुरबाजच्या रूपात पडला. तो ४ धावांवर बाद झाला. यानंतर गुलबदिन नायब, इब्राहिम जादरान, मोहम्मद नबी आणि नांगेयालिया खरोटेही स्वस्तात बाद झाले. अफगाणिस्तानकडून अझमतुत्लाह ओमरझाईने सर्वाधिक १० धवा केल्या. तर फलंदाज तर दुहेरी धावाही करू शकले नाहीत.

आफ्रिकेकडून मॅक्रो जेन्सन आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत अफगाणिस्तानच्या डावाला सुरूंग लावण्याचे मोठे काम केले. तर कॅगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -