Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडी१० हजारांपेक्षा कमी किंमतीला येत आहे Realmeचा जबरदस्त फोन, पहिल्या सेलमध्ये मिळणार...

१० हजारांपेक्षा कमी किंमतीला येत आहे Realmeचा जबरदस्त फोन, पहिल्या सेलमध्ये मिळणार डिस्काऊंट

मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी Realmeने बुधवारी एका नव्या स्मार्टफोन लाँचची घोषणा केली आहे. हा फोन Realme C61 असेल. तसेच हा स्मार्टफोन २८ जूनला लाँच केला जाईल. कंपनीने आधीच याचे डिझाईन आणि काही स्पेसिफिकेशन सांगितले होते. आता कंपनीने याचा रॅम, स्टोरेज पर्याय आणि किंमतीचीही माहिती दिली आहे. हा Realme C51चा अपग्रेड म्हणून मार्केटमध्ये आणण्यात आला आहे.

हा कंपनीचा एंट्री लेव्हल फोन असेल. या स्मार्टफोनमध्ये ओक्टा कोर UNISOC T612 प्रोसेसर मिळेल. सोबतच यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असेल. सोबतच कंपनी 5,000mAh बॅटरीही देत आहे.

सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ३२ एमपी प्रायमरी कॅमेरा ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये मिळेल. हा फोन धूळ आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IP54 रेटेड असेल.

ग्राहकांना हा फोन सफारी ग्रीन आणि मार्बल ब्लॅक कलर या दोन रंगात उपलब्ध आहे. याच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत ७,६९९ रूपये, 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ७९९९ रूपये आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ८,०९९ रूपये असेल. कंपनी हा स्मार्टफोन २८ जूनला दुपारी रिअल मीच्या अधिकृत वेबसाईट, फ्लिपकार्ट आणि दुसऱ्या मेनलाईन चॅनेल्सवर उपलब्ध कऱणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -