
नवी दिल्ली: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार वयासंबंधी तक्रारी वाढल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.
९६ वर्षीय अडवाणी वयोसंबंधित काही आजारांचा सामना करत होते. त्यामुळे वेळोवेळी त्यांचे घरीच चेकअप केले जात असे. बुधवारी संध्याकाळी उशिरा त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीने त्यांना एम्समध्ये आणण्यात आले. येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले जात आहे.
अडवाणी यांना वर्षी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्ने सन्मानित करण्यात आले होते. अडवाणी तब्येतीच्या कारणामुळे राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात सामील होऊ शकले नव्हते. यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्चला त्यांच्या निवासस्थानी जात भारतरत्ने त्यांना सन्मानित केले.