Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीPune Underground Metro : आनंदवार्ता! गणेशोत्सवात पुणेकरांना मिळणार स्वारगेटपर्यंत मेट्रोसेवा

Pune Underground Metro : आनंदवार्ता! गणेशोत्सवात पुणेकरांना मिळणार स्वारगेटपर्यंत मेट्रोसेवा

पुणे : मुंबईनंतर आता लवकरच पुण्यातही अंडरग्राऊंड मेट्रो (Pune Metro) धावणार आहे. येत्या गणेशोत्सवाआधीच (Ganeshotsav) ही मेट्रोसेवा पुणेकरांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट (Swargate) या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैअखेरीस ते पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे काम पूर्ण करावे असे महामेट्रोने नियोजन केले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पुणेकरांचा उत्साह आणखी वाढणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याची वाहतूक कोंडी पाहता महामेट्रो संचालकांनी पुण्यात अंडरग्राऊंड मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले असून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असणार आहेत. ३.६४ किलोमीटरचा हा भुयारी मार्ग जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावणार आहे. तर या मार्गाचे काम जुलैअखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे, अशी माहिती मिळत आहे.

मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना तपासणीसाठी बोलविण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रोकडून राज्य सरकारकडे ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात या मार्गावर सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यास ही सेवा सुरू होणे लांबणीवर पडू शकते, असे सूत्रसंचालकांनी म्हटले आहे.

मध्यवर्ती भागात भाविकांची सोय

शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागात मानाचे गणपती आहेत. या गणपतींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे. मध्यवर्ती भागात गर्दीमुळे भाविकांना वाहनाने जाणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी भाविक मेट्रोच्या सहाय्याने जाऊ शकणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -