
२ ते ५ वर्षांपर्यंत मुलांना ड्रायफ्रुट्स कमी प्रमाणात द्या. दिवसातून एक बदाम अथवा अर्धे अक्रोड पुरेसे आहे. अधिक खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ड्रायफ्रुट्स अतिप्रमाणात देणे योग्य ठरत नाही. कारण त्यांची पाचनअवस्था अद्याप तयार झालेली नाही.
सुरूवातीला थोडे कमी प्रमाणात द्या. ड्रायफ्रुट्स तुम्ही वाटून अथवा पाण्यात भिजवून देऊ शकता. बदाम, मनुके आणि खजुरापासून सुरूवात करा. मोठे तुकडे देऊ नका. ते गळ्यात अडकू शकतात.