Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडीNavneet Rana : असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा!

Navneet Rana : असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा!

नवनीत राणा यांची राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी; काय आहे कारण?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर २४ व २५ जून रोजी पार पडलेला खासदारांचा शपथविधी सोहळा हा चर्चेचा विषय ठरला. महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीत शपथ घेतली, काहींनी हिंदीत तर निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी घेतलली इंग्रजी शपथही बरीच चर्चेत आली. परंतु या सगळ्यात हैदराबादचे खासदार म्हणून निवडून आलेल्या एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisee) यांची शपथ वादाचा मुद्दा ठरली. त्यांच्या एका कृतीमुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) देखील आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ओवैसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी असदुद्दीन ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथ घेताना जय पॅलेस्टाईनची घोषणा दिली, त्यामुळे वाद निर्माण झाला. प्रोटेम स्पीकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा’ आणि नंतर ‘जय पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला होता. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या या शपथेवर टीका करण्यात आली.

याच प्रकरणी आता नवनीत राणा यांनीही कडक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राणा यांनी असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम १०२/१०३ नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नारा देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -