Sunday, June 30, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराष्ट्रपतींवर जादूटोणा करण्याचा प्रयत्न, राज्य मंत्र्यांसह ३ आरोपी अटकेत

राष्ट्रपतींवर जादूटोणा करण्याचा प्रयत्न, राज्य मंत्र्यांसह ३ आरोपी अटकेत

मुंबई: मालदीवमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील पोलिसांनी राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली देशाच्या सरकारमधील एका मंत्र्यांना अटक केली आहे. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार पोलिसांनी मोईज्जू यांच्या जवळ येण्यासाठी जादू-टोणा केल्याच्या आरोपामध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या राज्य मंत्री फातिमा शमनाज यांच्यासह इतर दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना अटक केल्यानंतर कोर्टात सादर करण्यात आले. येथे कोर्टाने या सर्वांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. स्थानिक वृत्तपत्रानुसार मंत्री शमनाज यांचे भाऊ आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. शमनाज राष्ट्रपती कार्यालयाचे मंत्री एडम रमीज यांच्या माजी पत्नी आहेत. शमनाज यांच्या अटकेआधी पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केली. तसेच पोलिसांनी त्यांच्या घरातून काही सामान जप्तही केले.

मंत्री शमनाज यांच्या घरातून जादूटोणाशी संबंधित सामान जप्त

पोलीस प्रवक्ता अहमद शिफानेही मंत्री शमनाज यांना मंगळवारी दोन अन्य आरोपींसोबत अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला. याआधी पोलिसांनी शमनाज यांच्या घरी छापा मारला होता. यावेळी त्यांच्या घरातून अशा गोष्टी जप्त करण्यात आल्या ज्याचा वापर जादूटोणा करण्यासाठी झाला होता.

मोईज्जू यांच्यासोबत अनेक पदांवर केले आहे काम

एप्रिलमध्ये पर्यावरण मंत्रालयात स्थलांतर होण्याआधी शमनाज यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवडण्यात आलेल्या मोईज्जू यांच्यासाठीच्या राष्ट्रपती भवनात राज्य मंत्री म्हणून काम केले होते. याआधी त्यांनी माले नगर परिषदेत मोईज्जू यांच्यासोबत काम केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -