Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

Ashish Shelar : कालच्या निवडणुकीत ठाकरे गटाने पैशांचा धुमाकूळ घातला!

Ashish Shelar : कालच्या निवडणुकीत ठाकरे गटाने पैशांचा धुमाकूळ घातला!

'अभ्यंकर भयंकर' तर 'परब अरब' असल्याप्रमाणे त्यांचे लोक पैसे वाटत होते...


आशिष शेलार यांचा उबाठा सेनेवर गंभीर आरोप


मुंबई : लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विधानपरिषद निवडणुका (Vidhanparishad Election) जाहीर झाल्या. या निवडणुकांमध्येही महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात जोरदार टक्कर असल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील शिक्षक व पदवीधर अशा चार मतदारसंघांमध्ये काल म्हणजेच मंगळवारी २६ जून रोजी मतदान पार पडलं. मात्र, या निवडणुकीसंदर्भात भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मोठा दावा केला आहे. निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाकडून (Thackeray Group) पैशांचं वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


विधीमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. तसेच, मतदार भाजपा उमेदवारांवर विश्वास दर्शवतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “काल विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. पण याचा जाणुनबुजून उल्लेख करावा लागेल की उबाठा सेनेने काल पैशांचा धुमाकूळ घातला होता”, असा आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला.


पुढे ते म्हणाले, “शिक्षकांमधून उमेदवार असलेले अभ्यंकर भयंकर असल्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तर दुसरीकडे पदवीधर मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार असणारे परब अरब असल्याप्रमाणे त्यांचे लोक पैसे वाटण्याचं काम करत होते. त्यामुळेच पैशाच्या जोरावर मतदारांना विकत घेता येतं असं मानून पैशांचा धुमाकूळ उबाठा सेनेने घातला. काही अन्य उमेदवारांनीही त्यांना साथ दिली. पण भाजपाचे दोन्ही उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संघटनेची पूर्ण ताकद लावली. माझा मतदारांवर विश्वास आहे. आमचा विजय मतदार सुकर करतील असा माझा दावा आहे”, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment