Tuesday, July 2, 2024
Homeमहामुंबईकोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत कोंकण विभागात ६४.१४ टक्के मतदान

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत कोंकण विभागात ६४.१४ टक्के मतदान

१ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी मुंबई : कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी  ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण १ लाख २० हजार ७७१ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण ७६ हजार ६४६ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मत मोजणी सोमवार दि. १ जुलै २०२४ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४, नेरुळ (पश्चिम), नवीमुंबई येथे होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -