Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीअकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी २७ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण हे नव्वदीपार गेले आहेत. पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा आहे. इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या नियमित फेरीत ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली आहेत. यात जवळपास निम्म्याहून अधिक म्हणजे ५६.१५ टक्के विद्यार्थ्यांची पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड झाली आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३४३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण एक लाख २० हजार २६५ जागा आहेत. प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीत ६६ हजार ९३४ विद्यार्थी असून त्यापैकी ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे. त्यातील २१ हजार ८४० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. कला शाखेत तीन हजार ६४० विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेत १४ हजार २११ विद्यार्थ्यांना, तर विज्ञान शाखेत २० हजार ६०४ विद्यार्थ्यांना आणि व्यवसाय शिक्षण शाखेत ४३५ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे.

महाविद्यालय अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तसेच प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. पहिल्या फेरीच्या निवड यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्या संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास, महाविद्यालयाकडून प्रवेश नाकारल्या अथवा घेतलेला प्रवेश रद्द केल्यास संबंधित विद्यार्थी पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जातील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -