Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाT20 World Cup 2024: भारत, इंग्लंड नव्हे तर हा संघ बनणार टी-२०...

T20 World Cup 2024: भारत, इंग्लंड नव्हे तर हा संघ बनणार टी-२० वर्ल्डकपचा विजेता, दिग्गजाची भविष्यवाणी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील(t-20 world cup 2024) पहिला सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि इंग्लंड आमनेसामने असतील.

आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपचा सेमीफायनलचा सामना खेळत आहे. याआधी हा संघ २००९ आणि २०१४च्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. एडन मार्करमच्या नेतृत्वात द. आफ्रिकेचा संघ आतापर्यंत २०२४च्या वर्ल्डकपमध्ये अजेय राहिला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर ब्रॅड हॉगने स्पर्धेच्या विजेत्यासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे.

द. आफ्रिका बनणार विश्वविजेता

एका चॅनेलशी बोलताना ब्रॅड हॉग म्हणाला, मला वाटते की यावेळेस दक्षिण आफ्रिका बाजी मारेल. त्यांच्याकडे खूप मजबूत टीम आहे. माझ्या मते जर आफ्रिकेने निडर होत सेमीफायनलचे आव्हान पार केले तर हा संघ वर्ल्डकपविजेता होऊ शकतो. या संघाकडे चांगले कॉम्बिनेशन आहे. आक्रमकता आहे तसेच सर्व खेळाडू विनम्र आहेत. मला कर्णधार म्हणून एडन मार्करम आवडतो. जो संयमासह अचूक निर्णय घेतो.

अफगाणिस्तानचे आव्हान सोपे नाही

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये अफगाणिस्तान एक टॉप संघ म्हणून उभा राहिला आहे. रशीद खानच्या नेतृत्वात अफगाण संघाने सगळ्यात पहिल्या ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडला हरवले. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर ८४ धावांनी मात केली होती. तर ग्रुप स्टेजमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला २१ धावांनी हरवत सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. त्यानंतर दबावाखाली झालेल्या बांगलादेशविरुद्ध ८ धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. हा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे आफ्रिकेसाठी हे आव्हान सोपे नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -